आयकर विषय वजावटी व सवलती

आयकर विषयी विशेष माहिती
आपण आयकर विषयी खूप पोस्ट वाचल्या असतील.काहीb नविन बदलांचा उल्लेख याठिकाणी करत आहे.
1) सर्व पुरूष व स्री यासाठी 2,50,000 रू.पर्यंत कर नाही .
2) करपात्र उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर 2000 रू. कर सवलत म्हणजे 2,70,000 रू.उत्पन्न पर्यंत कर नाही.
3) वाहन भत्ता व व्यवसाय कर पूर्ण वजा.
4) 2,00,000 रू.गृहकर्ज  व्याज वजा होते.कर्जाला दोघांची नावे आसल्यास 50% वजावट असणार
5) 80 C मध्ये 1,50,000 रू.गुंतवणूक करता येते.
त्यामध्ये LIC, GIS,PPF,जि.प,फंड ,पोस्ट आवर्त ठेव,
राष्ट्रीय बचत पत्र ,गृहबांधणी कर्ज मुद्दल, फक्त दोन आपत्यांची Tution Fee ,सुकन्या योजना व्याज, सन 2015-16 गृह खरेदी stamp duty  इत्यादी .
अशा प्रकारे आपणास कर सवालती घेता.येतील.
या व्यतीरिक्त आपणास पुढील काही सवलती मिळवता येतात

आयकर इतर सवलती

1)अपंग कर्मचारी कलम 80U 50,000रू.ऐवजी यावर्षी 75,000रू.व तीव्र अपंग 1,50,000रू. ची  करात सवलत
2) वैद्यकीय विमा 15000रू. ऐवजी 25,000 रू.व जेष्ठ नागरीकांना  30,000रू  असा वैद्यकीय विमा काढता येतो.
3) अपंग पाल्य आसेल तर त्याचा औषधोपचार साठी केलेला खर्च आता 50,000 ऐवजी 75,000 व तीव्र अपंग 1,00,000 ऐवजी 1,50,000 अशी सवलत मिळते वैद्यकीय दाखला आवश्यक आहे.
4) घरातील आजारी व्यक्तीला गंभीर आजारांवर केलेला (80 डिडि) खर्च 40,000रू.पर्यंत जेष्ठ नागरिक 60,000 व 80 वया पेक्षा जास्त 80,000 रू.ग्राह्य वैद्यकीय दाखला व10-I फॉर्म भरणे आवश्यक
5) शैक्षणिक कर्जावरील व्याजाची रक्कम सवलती मध्ये घेता येते.
** पगारा व्यतीरिक्त गुंतवणूक पावत्या आवश्यक असतात.

अशा प्रकारे आपण कर सवलती नियोजन करू शकतो.

टिप्पण्या

  1. सर आपण तयार केलेला ब्लोग अतिशय उपयुक्त आहे. अशीच माहिती आपण वारंवार पोस्ट करावी ही विनंती. Thank U Sir.

    उत्तर द्याहटवा
  2. चालू बजेट मध्ये तीन लाख पर्यंत सूट दिली आहे . मग २.५०००० घ्यावे की ३००००० कृपया मार्गदर्शन व्हावे.

    उत्तर द्याहटवा
  3. सर यात 2018-२०१९ या आर्थिक सत्रात वाहन भत्ता सूट बिलकुल नाही आहे प्लीज चेक बजेट 2018

    उत्तर द्याहटवा
  4. नमस्कार मान्यवर. मी औरंगाबाद जि तील एक मेव अपंग अवलंबून व बेरोजगार पती चे सा.न्याय मंत्रालय युनिक डिसॅबिलिटी कार्ड नुसार पत्नी नाते पालकत्व असलेली एकल महिला जि.प शिक्षिका आहे.कलम80डीडीने रू.एकलाख आयकर सवलत पती मुळे मला मिळते .तर व्यवसाय कर सूट व टीए 2000/₹मला मिळेल का?मी एकमेव असल्याने घरभाडे पतीपत्नी नोकरी वाल्यांना दोघांना मिळते.तर एकल महिलेचा विचार होईल का?..मार्गदर्शन करावे प्लीज. .

    उत्तर द्याहटवा
  5. सर...
    मी स्वतः दिव्यांग आहे....४०% प्रमाणपत्र
    माझा पाल्य सुद्धा दिव्यांग आहे...९६%...वरील मला कोणती करसवलत मिळेल...मार्गदर्शन व्हावं ही विनंती..🙏🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक