दप्तराचे ओझे समस्या व उपाय


दफ्तराचे ओझे- समस्या व उपाय

��������������
��महाराष्ट्र ॲडमीन पँनल
��������������

⚠️मा.उच्च न्यायालयाने आजच दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारला फटकारले आहे.

⚠️चला आपण याविषयाची संपुर्ण माहिती घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कसे कमी करायचे हे पाहू.
��������������

�� मुलांवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात शिफारसी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली होती.

�� शिक्षण संचालक महावीर माने यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अहवाल न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाला सादर करण्यात आला.

�� त्यातील शिफारसी चांगल्या असल्याचे मत खंडपीठाने व्यक्त केले आणि यासंदर्भात काही सूचना केल्या. या अहवालाचा अर्जदारांनी अभ्यास करून आपले मत मांडावे, असेही न्यायालयाने सांगितले.

��दप्तराचे ओझे किती असावे, याच्या मानकापेक्षा तिप्पट ओझे 12 वर्षांच्या मुलांच्या पाठीवर असते, असे निरीक्षण उच्चस्तरीय समितीने नोंदवले आहे.
याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली.

�� सामान्यतः मुलांच्या वयाच्या 10 टक्के एवढेच दप्तराचे ओझे असावे, असे अपेक्षित आहे; मात्र 12 वर्षांच्या मुलांच्या दप्तराचे ओझे 30 टक्के, म्हणजे साडेतीन किलो असते, असेही समितीला आढळून आले आहे.

�� राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशी ��

�� मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सत्रनिहाय कमी पानांची एकत्रित पुस्तके काढावीत.

�� एका दिवशी केवळ दोन किंवा तीन विषयांच्या तासिका असाव्यात.

�� शाळेतील कपाटांत वह्या-पुस्तके ठेवावीत किंवा पुस्तकांचे दोन संच (घर आणि शाळेसाठी) करावेत.

�� संगणकाद्वारे अभ्यास करावा.

�� क्रीडा साहित्य शाळेनेच द्यावे आणि फिल्टर केलेले स्वच्छ पाणी पुरवावे.

��अहवालातील निष्कर्ष��

�� ग्रामीण भागात दप्तराचे वजन कमी, शहरांत जास्त

�� सीबीएसई, आयसीएसई शाळांची दप्तरे जास्त जड

�� मणके, स्नायूंची झीज, डोकेदुखी, पाठदुखी, थकवा, वाढीवर परिणाम, मानसिक ताण, फुप्फुसांच्या कार्यक्षमतेत घट, सांधे आखडणे असे दुष्परिणाम

�� 10 वर्षांपेक्षा लहान 58 टक्के मुलांना त्रास

�� 12 वर्षांपेक्षा लहान 75 टक्के मुलांना त्रास

�� इतर शिफारसी ��

�� दोन किंवा तीन महिन्यांच्या सत्रानुसार लहान पुस्तके छापावीत

�� भाषा, गणित, विज्ञान, इतिहास-भूगोल अशा तीन पुस्तकांची एकत्रित बांधणी

�� बालभारतीने पुस्तक छपाईसाठी वजनाला हलका कागद वापरावा.

�� गृहपाठाच्या वह्या दोन-तीन विषयांसाठी एकत्रित कराव्यात

�� 200 ऐवजी 100पानी वा त्याहूनही कमी पानांच्या वह्या घ्याव्यात

�� जाड कव्हरच्या वह्यांवर बंदी घालावी

�� गृहपाठाचे विषयनिहाय साप्ताहिक वेळापत्रक करावे

�� वह्यांऐवजी वर्कशीटचा वापर करून त्या वर्गातच जमा कराव्यात

�� वेळापत्रकात दररोज केवळ तीन विषयांच्या तासिका असाव्यात

�� कमी तासिकांमुळे वह्या व पुस्तके कमी लागतील

�� स्वाध्याय, गाईड, मार्गदर्शक पुस्तके शाळेत आणू नयेत

�� सीबीएसई, आयसीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांनी एकच पुस्तक निवडावे

�� संगणकाद्वारे ई-लर्निंगवर भर द्यावा

�� पुस्तकांऐवजी ऑडिओ, व्हिडीओ स्वरूपात अभ्यास व्हावा

�� ई-लर्निंग, टॅब्लेट पीसी, प्रोजेक्‍टर अशी डिजिटल क्‍लासरूम व्यवस्था

�� बालभारतीच्या संकेतस्थळावर पुस्तके उपलब्ध करून द्यावीत

�� शैक्षणिक संकेतस्थळे आणि साहित्याचा उपयोग करावा

��शाळांसाठी सूचना��

�� वह्या व पुस्तके शक्‍यतो शाळेतच ठेवावीत किंवा पुस्तकांचे दोन संच करून एक शाळेत व एक घरी ठेवावा

�� वह्या, पुस्तके ठेवण्यासाठी शाळेत कपाटे, लॉकर ठेवावेत

�� क्रीडा साहित्य, पिण्याचे फिल्टर्ड पाणी शाळेनेच पुरवावे.

��स्त्रोत -दै.सकाळ शनिवार
४ जुलै  २०१५��

�� हा व असे इतर वाचनीय शैक्षणिक लेख वाचण्यासाठी खालील ब्लॉगला अवश्य भेट द्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ