शालार्थ मधून paySlip Download कशी करावी?

 


1) सर्व प्रथम शालार्थ ची वेबसाईट ओपन करावी.

शालार्थ वेबसाईट ओपन करण्यासाठी खाली क्लीक करा.


2) त्यानंतर शालार्थ चे login page ओपन होईल.ते वर दिलेल्या image सारखे दिसते.

3) शालार्थ login Page वर User Name या ठिकाणी आपला शालार्थ id टाकावा.जो 02DED पासून सुरू होतो.

4) password च्या ठिकाणी आपला password टाकावा.सुरुवातीचा password ifms123 असतो.जर password विसरला तर मुख्यध्यापक लॉगिन वरून reset करावा.

5)captcha टाकावा व submit वर क्लीक करावे.

6)लॉगिन झाल्यावर वरच्या बाजूला आपले नाव ,शाळेचे नाव दिसेल.

7)worklist या टॅब वर क्लीक करावे.त्या खाली EMPLOYEE CORNER ही टॅब दिसेल त्यावर क्लीक करावे.त्या नंतर EMPLOYEE PAYSLIP ही टॅब दिसेल त्यावर क्लीक करा.

8) या ठिकाणी आपली माहिती दिसेल.त्या खाली MONTH दिसेल त्या पुढे आपल्याला पाहिजे असलेला महिना DROP DOWN मेनूतून निवडा.

9) Year च्या पुढील drop down मेनूतून वर्ष निवडा.2019 पासून pay slip उपलब्ध आहेत.

10) त्यानंतर view pay slip वर क्लीक करा.

11)आता आपण निवडलेल्या महिन्याची pay slip दिसेल.

12) ही payslip मोबाईलवर download करण्यासाठी खाली तीन टॅब आहेत.त्यातील print या टॅबवर क्लीक करा.

13)आता या payslip चा printpreview दिसेल जर आपला मोबाईल कोणत्या प्रिंटरला जोडलेला असेल तर प्रिंट देता येईल.

14) ही payslip download करण्यासाठी printview page वर उजव्या वरच्या कोपऱ्यात तीन तीन दिसतील त्यावर क्लीक केल्यास save as pdf दिसेल त्यावर क्लीक करा. त्यानंतर file ला नाव द्या व save वर क्लीक करा आता तुमची payslip pdf स्वरूपात download होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

जुलै 2022 ते डिसेंबर 2022 महागाई भत्ता फरक excel File