जिल्हा अंतर्गत बदली प्रकिया कशी होणार
जिल्हा अंतर्गत बदली 2022 खालील क्रमाने होणार आहे(यातील लाल रंगातील टप्पा शिक्षकांसाठी आहे.इतर टप्पे नाहीत)
#अवघड क्षेत्राची यादी प्रकाशित करणे
#बदली प्राप्त पात्र व बदली यादी पाठवा जाहीर करणे
#रिक्त पदाची यादी अद्यावत करणे
#विशेष संवर्ग भाग 1 आणि विशेष भाग 2 चे फॉर्म भरणे(5/11/2022 ते 7/11/2022 बदली हवी किंवा नको यासाठी फॉर्म भरणे)
#बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त याद्या पुन्हा जाहीर करणे आणि विशेष संवर्ग भाग 1आणि भाग 2 यांच्या याद्या जाहीर करणे
#शिक्षणाधिकाऱ्याकडे अपील करणे
#अपील मंजूर करणे किंवा नाकारणे
#मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करणे
#मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्णय घेणे
#बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त विशेष संवर्ग
#भाग 1 व भाग 2 यांच्या याद्या पुन्हा जाहीर करणे
#रिक्त पदाची यादी जाहीर करणे
#विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरणे.(24/11/2022 ते 26/11/2022 ज्यांनी बदली हवी असा फॉर्म भरला आहे त्यांंनी आपल्या बदलीसाठी शााळेचा प्राधान्य क्रम भरणे)
#विशेष संवर्ग भाग 1 बदली प्रक्रिया चालवणे
#रिक्त पदाची यादी प्रकाशित करणे
#विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरणे.(1/12/2022 ते 3/12/2022 भाग 2 मध्ये येणारे शिक्षक बदली साठी प्राधान्य क्रम भरतील)
#विशेष संवर्ग भाग 2 बदली प्रक्रिया चालवणे
#रिक्त पदाची यादी प्रकाशित करणे
#बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे.(8/12/2022 ते 10/12/2022 अवघड श्रेत्रातील 3 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक प्राधान्य क्रम भरतील.)
#बदली अधिकार प्राप्त बदली प्रक्रिया चालवणे
#रिक्त पदाची यादी प्रकाशित करणे
#बदली पात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे.(15/11/2022 ते 17/12/2022 सुगम क्षेत्रात 10 वर्षे व एका शाळेवर वर्ष झालेले शिक्षक प्राधान्य क्रम भरतील)
#बदली प्रात्र बदली प्रक्रिया चालवणे
#रिक्त पदाची यादी प्रकाशित करणे
#विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्याय भरणे(22/12/2022 ते 24/12/2022 ज्या शिक्षकांना बदली आपण दिलेल्या शाळातील शाळा मिळाली नसेल तर तसे विस्थापित शिक्षक प्राधान्य क्रम भरतील)
#विस्थापित शिक्षकांचा राऊंड विस्थापित शिक्षकांसाठी बदली प्रक्रिया चालवणे
#रिक्त पदाची यादी जाहीर करणे
#बदली पात्र शिक्षकांची (10 वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेले शिक्षक) यादी प्रसिद्ध करणे
#अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्याचा राऊंड.(30/12/2022 ते 1/01/2023)
#अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे
#बदली आदेश प्रकाशित करणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा