अकाउंट हँक झालय.परत मिळवा.


🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

💻💻अकाउंट हॅक झालंय? परत मिळवा..
ac-hack
>> नॉलेजबुवा
हल्ली प्रत्येकाचा सोशल वावर वाढला आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर असणे नित्याचे झाले आहे. हा वावर वाढल्यामुळे हॅकिंगसारख्या गैरप्रकारांनाही खुले रान मिळाले आहे. फेसबुकचे अकाउंट हॅक होणे ही अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. फेसबुक, जीमेल किंवा ट्विटरचे अकाउंट हॅक झाले, तर त्याचा होणारा गैरवापर महागात पडू शकतो. या पार्श्वभूमीवर हॅ​किंगपासून बचाव करण्याच्या या काही उपाययोजना...
'फेसबुक'च्या अकाउंटची 'घरवापसी'
जर तुमचे फेसबुकचे अकाउंट कोणी हॅक करण्याचा प्रयत्न केला असेल, तर ते पुन्हा तुमच्या नियंत्रणाखाली आणणे फारच सोपे आहे. खालीलप्रमाणे कृती केल्यास फेसबुक अकाउंट पुन्हा वापरण्यायोग्य होऊ शकते.
Facebook.com/hacked या लिंकवर जा. तेथे एक बटन दिसेल, ज्यावर My account has been Compromised असे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक स्क्रीन समोर येईल. तेथे पासवर्ड देऊ नका. त्यानंतर Forgotten your passwordवर क्लिक करा.
आता जी स्क्रीन येईल, त्यावर यूजरनेम अथवा ई-मेल किंवा तुमच्या अकाउंटशी जोडलेल्या मोबाइल क्रमांक या तिन्हीपैकी एकाची माहिती द्या. जर हॅक करणाऱ्याने ई-मेल आणि मोबाइल क्रमांक बदलला असेल, तर तुम्ही यूजरनेम टाका. कारण हॅकर यूजरनेम बदलूच शकत नाही.
त्यानंतर फेसबुक तुमच्या अकाउंटला सर्च करून समोर आणेल. आता पासवर्डच्या जागी हॅक करण्यापूर्वीचा किंवा त्या आधीचा पासवर्ड टाका. त्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड टाकण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल.
आता स्क्रीनवर एकापेक्षा अधिक ई-मेलचे पर्याय दिसून येतील. त्यानंतर त्यापैकी कोणत्या ई-मेल आयडीचा वापर करून तुम्ही अकाउंट चालू ठेवणार आहात, या विषयी विचारणा करण्यात येईल. त्यापैकी एक ई-मेल निवडल्यानंतर अन्य ई-मेलमधून तुमचे फेसबुक अकाउंट लॉग इन करण्याची सुविधा काढून घेतली जाईल. त्यानंतर तुम्ही निवडलेला एक ई-मेल आणि नव्या पासवर्डच्या मदतीने फेसबुक पुन्हा कार्यरत ठेवू शकाल.
फेसबुकद्वारा अकाउंट सर्च करून सर्व माहिती समोर आणल्यानंतर जर तुम्ही पासवर्ड देऊ इच्छित नसाल, तर कोणताही पर्याय निवडू नका. तुम्ही फक्त No longer have access to these?वर क्लिक करा. त्यानंतर I can npt access my email account वर क्लिक करा.
त्यानंतर फेसबुककडून How can we reach you? अशी विचारणा करण्यात येईल. त्यानंतर तुम्ही ई-मेल किंवा मोबाइल नंबर द्या. जेणेकरून फेसबुककडून तुम्हाला लिंक पाठविण्यात येईल. त्यानतंर तुम्ही पासवर्ड पुन्हा रिसेट करू शकता. त्यासाठी तुम्ही कोणत्याही परिचिताच्या ई-मेल किंवा मोबाइलच्या क्रमांकाचा उपयोग करू शकता. त्यानंतर व्यक्तिग​णिक फेसबुकचा व्यवहार बदलतो. फेसबुकतर्फे विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची कल्पना करू शकत नाही. तुम्ही आतापर्यंत फेसबुकवर केलेल्या अॅक्टिव्हिटिजवर आधारीत प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर तुम्ही त्या प्रश्नांची खरी आणि योग्य उत्तरं दिली तर काही मिनिटांत किंवा काही तासांत तुम्ही दिलेल्या ई-मेल किंवा मोबाइल क्रमांकावर नवीन पासवर्ड पाठवला जातो.
दुर्घटना से देर भली..
अकाउंट हॅक झाल्यानंतर करावा लागणारा दीर्घ द्रा​विडी प्राणायाम टाळायचा असेल, तर तीन गोष्टींचा कायम अवलंब करा. पहिली गोष्ट म्हणजे लॉग इन करताना मोबाइल व्हेरिफिकेशन करा. (सेटिंगमध्ये जाऊनही हे काम करता येऊ शकते.) दुसरी गोष्ट म्हणजे अकाउंटचा पासवर्ड कधीही सेव्ह करू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या फ्रेंडलिस्टमधील एका व्यक्तीला तुमच्या अकाउंटचा वारसदार बनवून टाका आणि ही माहिती फेसबुकला कळवा. हे देखील सेटिंगमध्ये जाऊन करता येते. त्यानंतर लॉग इन करताना मोबाइलवर आलेला कोड स्क्रीनच्या खालील मोकळ्या जागेवर टाका. जर संबंधित मोबाइल तुमच्याच जवळ असेल, तर दुसरी कुणीही व्यक्ती त्याचा गैरवापर करू शकणार नाही. फेसबुकवर वारसदार नेमल्याने तुमचे अकाउंट हॅक झाले, तरी त्याची माहिती फेसबुकपर्यंत पोहोचवता येऊ शकते. त्यानंतर फेसबुक वारसदाराला नवा पासवर्ड देऊ शकेल.
टिवटिव बंद झाल्यास..
तुमचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यास खालील उपाय वापरून ते नियंत्रणात आणता येऊ शकते.
सर्वप्रथम support.twitter.com/forms/signin या लिंकवर जा.
त्यानंतर were you able to access your account? असा एक पर्याय येईल.
त्यावेळी No असा पर्याय निवडा आणि स्क्रीनवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. जर ड्रॉप डाउनचा फॉर्म आला, तर तेथेही योग्य माहिती द्या.
माहिती आणि प्रश्नांची उत्तरे योग्य दिली, तरच तुमचे हॅक झालेले ट्विटर अकाउंट तुमच्या नियंत्रणात येईल.
हॅकिंगपासून कसे सुरक्षित रहाल?
ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर ते नियंत्रणात आणण्याचा उपाय आपण वर पा​हिला. हे सर्व करण्यापेक्षा अकाउंट हॅक न होण्याची खबरदारी घेणे, हा चांगला पर्याय होऊ शकतो.
लॉग इन करताना मोबाइल व्हेरिफिकेशन करा.
पासवर्ड सारखा टाकण्यापासून वाचण्यासाठी बहुतांश मंडळी आपला पासवर्ड सेव्ह करून ठेवतात. ही बाब अत्यंत चुकीची आहे. पासवर्ड सेव्ह करण्यापेक्षा तो लक्षात ठेवण्याची सवय लावून घ्या.
बहुतांश मंडळी ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर ते चालू करण्यापेक्षा नवीन अकाउंट उघडण्याला प्राधान्य देतात.
जीमेल अकाउंट हॅक झाल्यास..
जीमेलचे अकाउंट हॅक झाल्यानंतर ते पुन्हा नियंत्रणात आणण्याचा उपाय वेळखाऊ आणि थकविणारा आहे. असे असले, तरी अवघड मुळीच नाही. जीमेल अकाउंट पुन्हा नियंत्रणात आणण्यापूर्वी किमान खालील माहितीचा आढावा घ्या..
लॉग इन करण्यासाठीचा पासवर्ड काय आहे?
जेव्हा तुम्ही शेवटचे जीमेल अकाउंट कधी, कोठून आणि किती वाजता अॅक्सेस केले आहे?
कोणत्या महिन्यात आणि कोणत्या वर्षी तुम्ही तुमचे अकाउंट उघडले?
तुम्ही तुमच्या ई-मेलवरून वारंवार कोणत्या पाच ई-मेल आयडींवर मेल पाठवले होते?
किमान चार लेबलची नावे.
ब्लॉगर, कॅलेंडर यांसह कोणत्या गुगल उत्पादनांचा तुम्ही वापर केला आहे? त्यांचा वापर नेमका कधी (महिना आणि वर्ष) केला आहे?
तुमच्या ई-मेल खात्याशी जोडलेला मोबाइल क्रमांक.
तुम्ही तुमचे जीमेल अकाउंट का अॅक्सेस करू शकत नाही, त्या विषयीची माहिती.
हे आणि खात्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात येतील. त्यामुळे त्यांची उत्तरे आधी तयार ठेवा.
हॅकमुक्त करण्याचे उपाय..
सर्वप्रथम google.com/accounts/recovery वर क्लिक करा. त्यानंतर समोर येणाऱ्या स्क्रीनवर I don't know my password वर क्लिक करा. तुमचा ई-मेल देऊन Continue वर क्लिक करा.
समोर येणाऱ्या स्क्रीनवर पासवर्ड देण्याऐवजी I Don't know वर क्लिक करा.
त्यानंतर समोर येणाऱ्या स्क्रीनवर तुमचाच दुसरा ई-मेल आयडी द्या. त्यानंतर Continue वर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या समोर येणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.
तुम्ही जर प्रश्नांची योग्य उत्तरे दिलीत, तर तुम्ही दिलेल्या दुसऱ्या ई-मेल आयडीवर नवा पासवर्ड पाठविण्यात येईल.
जर तुम्ही दिलेली माहिती चुकीची असेल, तर गुगलतर्फे पुन्हा तुम्हाला नव्याने माहिती देण्यासाठी सांगण्यात येईल.
खबरदारी हाच बचाव होय..
सोशल नेटवर्किंगवर वावरत असताना खालील बाबींची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
कायम अनोखे पासवर्ड ठेव. आपला वाढदिवस, कुटुंबीयांपैकी कोणाचीही नावे, मोबाइल क्रमांक, मुलांची नावे आदी पासवर्ड ठेवू नयेत. पासवर्डमध्ये विशेष अक्षरांचा वापर करावा. सबंध पासवर्डमध्ये मोठ्या आणि छोट्या लिपितील अक्षरांचाही वापर अवश्य करावा. काही ठरावीक कालावधीनंतर पासवर्ड सातत्याने बदलावा.
पासवर्ड स्वतःपुरताच मर्यादित ठेवा. पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. पासवर्ड मोबाइल अथवा कम्प्युटरवरही दिसेल अशा जागी ठेवू नका.
कोणत्याही ओळखीच्या अथवा अनोळखी व्यक्तीकडून मेल आल्यास पुरेशी खात्री करूनच तो उघडा. कारण अशाप्रकारच्या मेलमध्ये व्हायरस असण्याचीच शक्यता अधिक असते. अशा मेलचा अंदाज न आल्यास ते डिलीट करणे कधीही उत्तम. ज्या व्यक्तीकडून तो आला असेल, त्यालाही या बाबतची माहिती देणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला फेसबुकवर चुकून अश्लील किंवा विचित्र फोटो दिसल्यास त्याला चुकूनही क्लिक करू नका. असे फोटो दिसल्यास Report Abuse या पर्यायाला क्लिक करा. जेणेकरून अशा फोटोंविषयी फेसबुककडे रितसर तक्रार नोंदवली जाईल.
फेसबुकचा वापर करताना प्रायव्हसी सेटिंग अशी ठेवा की कुणीही अनोळखी व्यक्ती तुमच्या वॉलवर पोस्ट करू शकणार नाही. किंवा तुम्ही टाकलेली पोस्ट पाहू शकणारही नाही.
जर हॅकरने व्यक्तीचे फेसबुक अकाउंट किंवा ई-मेल हॅक केला असेल, तर त्याची तक्रार पोलिसांकडे अथवा सायबर क्राइमकडे देणे आवश्यक आहे.
 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

जुलै 2022 ते डिसेंबर 2022 महागाई भत्ता फरक excel File