बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान आणि शिक्षक

बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान आणि शिक्षक


डिजिटल शाळा  : आजकाल शाळांचे पारंपारिक स्वरूप बदलत आहे. पूर्वी खडू, फळा, डस्टर, शैक्षणिक तक्ते, पृथ्वीचा गोल, मातीच्या मण्यांच्या माळा, नकाशे एवढं साहित्य वर्गात असलं की शाळेचा वर्ग सुरळीत चालू राहायचा.

     पण आताचे शिक्षक पाढे पाठ करून घेण्यासाठी आधी ते मोबाईलवर रेकॉर्ड करतात, मग विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतात. आता विद्यार्थ्यांना धडा शिकविणे ज्ञानरचनावादाकडून उलटा प्रवास केल्यासारखा आहे. विद्यार्थी संगणकावर स्वत:च धडा शिकतात.

    काही शाळांमध्ये तर विद्यार्थी स्वत:च डिजिटल धडे पीपीटी च्या साहाय्याने तयार करतात. काही शाळांमध्ये प्रोजेक्टर आहेत. काही ठिकाणी संगणक प्रयोगशाळा (computer lab) आहेत. बरेच उत्साही शिक्षक स्वत:च्या लॅपटॉपचा वापर करतात. काहीजण तर अॅण्ड्रॉईड मोबाईल वरील अॅप्स चा चातुर्याने उपयोग करतात.

   डिजिटल शाळा, डिजिटल शिक्षक!

जिल्हा परिषदेच्या शाळाही कात टाकताहेत. काही शाळांनी अाय एस ओ मानांकनही मिळवलंय. बऱ्याच तरुण शिक्षकांनी स्वत: कष्टाने, अभ्यासपूर्वक वेबसाईटसची निर्मिती केली अाहे. हे सर्व चित्र निश्चितच् अाशादायक अाहे. कारण अाजचा शिक्षक कुठेही कमी नाही. सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून स्वत:ची व्यवसायिक पात्रता वाढवून स्पर्धेच्या जगात टिकून राहतील तेच शिक्षक भविष्य घडवतील.

    शिक्षकांना बदलते तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे अाहे. त्यादृष्टीने पुढील माहिती उपयोगी पडेल.

१. अॅण्ड्रॉईड मोबाईलवर (google)play store हा अायकॉन असतो. त्यावर ई-मेल अाय डी सेट केला की हजारो apps चे भांडार खुले होते. क्रेडीट किंवा डेबिट कार्ड असल्यास paid apps विकत घेऊन डाऊनलोड करता येतात. बऱ्याच free apps ही अाहेत. मराठी मूळाक्षरांसाठी varnamala lite ही फ्री अॅप अाहे. Book creator हे अॅप्लिकेशन वापरून डिजिटल धडे किंवा पुस्तक तयार करता येते. सध्या बाजारात अनेक खाजगी कंपन्यांचे android tablets अॅनिमेटेड स्वरुपात अभ्यासक्रम प्री-लोड करुन देतात. पण book creator या अॅप्लिकेशनच्या साहाय्याने शिक्षक स्वत: डिजिटल धडे किंवा पुस्तक तयार करू शकतात व google play store वर फ्री डाऊनलोडसाठी ठेऊ शकतात.

२. www.youtube.com ह्या वेबसाईटवर व्हिडीअोज शेअर करता व बघता येतात. M S Excel, Powerpoint, Word यावरील फाईल्स कशा तयार करायच्या त्याचे व्हिडीअोज बघता येतात. Animated videos, cartoons, rhymes, मराठी कविता, गाणी, learning English असे विद्यार्थी व शिक्षकांना उपयोगी लाखो व्हिडीअोज यावर अाहेत.

३. परदेशात अायफोन, अायपॅड व अायपॉड चा शिक्षणासाठी अनेक शाळांमधून वापर होत अाहे. मराठी मधून फारच कमी apps असल्यामुळे अापल्याकडे त्याचा वापर केला जात नाही. परंतु भविष्यात अायपॅडचा वापर वाढण्याची शक्यता अाहे. i-Mac किंवा macbook वर ibooks store हे अॅप्लिकेशन तर जबरदस्त अाहे. यावर चित्र, अावाज, टेक्स्ट, व्हिडीओ च्या साहाय्याने digital धडे किंवा पुस्तक तयार करता येते. अधिक माहितीसाठी www.apple.com/in/ला भेट द्या.

४. फेसबुक वर महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक ग्रुप्स अाहेत. त्यावर शैक्षणिक घडामोडी, प्रयोग, उपक्रमशील शाळा व शिक्षक इत्यादींची माहिती अद्ययावत स्वरुपात शिक्षकांना मिळू शकते.

५. भारतातील व परदेशातील शैक्षणिक तंत्रज्ञानासंबंधी उपयुक्त माहिती पुढील वेबसाईटवर मिळू शकते.

   1) www.emergingedtech.com

   2) www.edtechreview.in

   3) www.khanacademy.org

   4)  www.thefreemath.org

   5) www.teachersofindia.org

   6)www.teachersastransformers.org

   7) www.ciet.nic.in  

 

    

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक