भाग 18-समुद्रावर पसरलेले तेल गोळा करण्याचे यंत्र

🎡🎡 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 18 🎡🎡
🌺 समुद्रावर पसरलेले तेल गोळा करण्याचे यंत्र🌺
🍀🍀 साहित्य -- लाकडी जहाज 12 व्होल्ट बॅटरी एक बेकार सीडी  मोठी परात किंवा कूलर ट्रे
🍃 पार्श्वभुमी--  बर्‍याच वेळी तेल वाहून नेणारे जहाज अपघाताने फुटतात व सर्व पाण्यावर तेलाचा तवंग पसरतो या तवंगामुळे पर्यावरणाला हानी तर पोहोचतेच शिवाय जलचर सुद्धा मरतात व मौल्यवान तेल सुद्धा नष्ट होते  या तेलाच्या तवंगावर साबनाचा फवारा मारला तर  हा तवंग काही दूर लोटला जातो पण तवंग नष्ट होत नाही   काही दिवसांनी  तवंगामध्ये  सुक्ष्म जिव तयार होउन ते खावुन टाकतात  तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो
🌺🌺 कृती-- 1 ) एक लाकडी प्लायवूड चे जहाज बनवा     एक  बेकार झाले ली सिडी घ्या  तिच्या गोलाकार भागावर   वायरचे बारीक बारीक तुकडे  काही अतंरावर चिपकवा जेणेकरून सिडी गोल फिरतांना पाणी वर फेकेल  सिडीला मध्यभागी एक बारीक छिद्र पाडा
2) जहाज परातीतील पाण्यात उभे करून पाण्यात किती बुडते याचा अंदाज घ्या
जहाजाला  एक डीसी मोटर(चक्र गोल फिरवणारी) आतील बाजूने अशी फिट करा की   मोटरचा दांडा जहाजाबाहेर निघेल
3) सिडीला छिद्र पाडले ला भाग मोटरवर फेव्हीस्टीक लावून फिट करा ज्यामुळे चाक फिरताना बाहेर येणार नाही
4) सिडीवर एक जाड प्लॅस्टिक ची पट्टी अर्धगोलाकार करून चिपकवा जेणेकरून सिडी ने वर फेकलेले पाणी त्याला अडून खाली ओघळेल  हे तेलयुक्त पाणी  एका डबीत पकडा किवा ती डबी तेथेच चिपकवून घ्या
5) या डबीत तेल आणि पाणी असेल  या  पाण्याला काही काळ स्थिर ठेवले तर  विलगीकरण पद्धतीने तेल आणि पाणी वेगळे दिसुन येतील
🌺 अस्या प्रकारे आपण वाया गेलेले तेल सुद्धा काही प्रमाणात परत मिळवू शकतो व पर्यावरणाचे रक्षण होईल
🌺🌺 टिप-- जहाजाला खालील भागाने जलावरोधक करा  कलर मारा जेणेकरून पाणी आत शिरणार नाही
     जहाजावर ऑइल कलेक्टीग टॅक म्हणुन काही प्लॅस्टिक च्या डब्या ठेवा
   जहाजाला  परीस्थिती अनुरूप सजवा
🌺 परातील पाणी म्हणजे समुद्र अशी कल्पना करा व त्यात काळे  असे जळलेले थोडे ऑईल टाका
         सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ