विशेष संवर्ग शिक्षक भाग-1
1.8 विशेष संवर्ग शिक्षक भाग-1 :- खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-1 म्हणून गणले जातील.
1.8.2 दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक14.1.2011 मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱयाचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलाचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक.
1.8.3 हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक
1.8.4 जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक /डायलीसीस सुरु असलेले शिक्षक
1.8.5 यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.
1.8.6 कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक
1.8.7 मेंदूचा आजार झालेले शिक्षक
1.8.8 थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्धभवणारे आजार{उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase defiency व इतर आजार)}(पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ)
1.8.9 माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानाच्या पत्नी / विधवा
1.8.10 विधवा शिक्षक
1.8.11 कुमारीका शिक्षक
1.8.12 परिक्तक्त्या घटस्फोटित महिला शिक्षक
1.8.13 वयाची 53 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक
1.8.14 स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिकांचा हयात असेपर्यंत)
खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :
1.8.15 हृदय शस्त्रक्रिया झालेले.
1.8.16 जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक /डायलीसीस सुरु असलेले
1.8.17 यकृत प्रत्यारोपण झालेले
1.8.18 कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले.
1.8.19 मेंदूचा आजार झालेले.
1.8.20 थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले.
विशेष संवर्ग 1 यांची बदली प्रक्रिया
*विशेष संवर्ग-1 शिक्षकांना त्यांचा पसंती क्रम भरण्यासाठी (Submit) तीन दिवसांचा अवधी देण्यात येईल. तदनंतर विषय संवर्ग भाग-1 यांच्या बदल्या करण्यात याव्यात.
*विशेष संवर्ग भाग-1 शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरूनच बदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत आले असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरण पत्र क्रमांक तीन मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील
*विशेष संवर्ग अंतर्गत विनंती बदलीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील
*एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवाजेष्ठता विचारात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमता बदली अनुदेय राहील
*सेवाजेष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुदेय राहील
*जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंतीप्रमाणे एकाही शाळेमध्ये बदली देता आली नाही तर त्यांची बदली होणार नाही
विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 चा ऑफलाइन pdf फॉर्म download करण्यासाठी खाली क्लीक करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा