प्लास्टिकचे आधारकार्ड बनवा
150 रुपयांत बनवा प्लास्टिक आधार कार्ड; वाचा, ऑनलाइन- ऑफलाइन पद्धत
दिव्य मराठी वेब टीम
प्लास्टिक आधार कार्ड बनवणे अत्यंत सोपे
आहे. जुने आधार कार्ड कागदाचे आहे. ते
लवकर खराब होण्याची शक्यता जास्त
आहे. प्लास्टिकचे आधार कार्ड दीर्घकाळ
टिकते. आधार कार्ड बनवण्याच्या
ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन पद्धती
आहेत. यासाठी 100 ते 200 रुपये खर्च
येतो.
या पॅकेजमधून आम्ही आपल्याला प्लास्टिक आधार कार्ड बनवण्याच्या ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीविषयी माहिती घेवून आलो आहे.
ऑनलाइन आधार कार्ड बनवण्याच्या स्टेप्स
STEP-1.
तुम्ही आधी आधार कार्ड बनवले असेल तर तुम्हाला ऑनलाइन प्लास्टिक आधार कार्ड बनवता येईल. यासाठी
www.printmyaadhaar.com
वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
STEP-2.
www.printmyaadhaar.com वर
रजिस्ट्रेशन करताना नाव, मोबाइल नंबर व ई-मेल आयडी देणे अत्यावश्यक आहे.
STEP-3.
रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ई-मेल आयडीवर ओटीपी कोड येईल. ओटीपी कोडसोबत तुम्हाला तुमची वैयक्तीक माहिती द्यावी लागेल. ई-आधार कॉपी अपलोड करावी लागेल.
STEP-4.
ई-आधार कार्डची कॉपी अपलोड केल्यानंतर तुम्हाला पिनकोडसह पत्र व्यवहाराचा पत्ता द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला कार्ड मेकिंग चार्जेज, शिपमेंट फीस व टॅक्स मनीची पॉप अप विंडो उघडेल. त्यात तुम्हाला एकूण शुल्काचा तपशील भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करावे लागेल. एका आठवड्याच्या आत रजिस्टर्ड पोस्टने प्लास्टिक आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर येईल. प्लास्टिक आधार कार्ड बनवण्यासाठी युजरला जवळपास 106 रुपये खर्च येतो.
ऑफलाइन प्लास्टिक कार्ड बनवण्याची पद्धत
प्लास्टिक आधार कार्ड बनवण्याची ऑनलाइन पद्धतही आहे. प्लास्टिक आधार कार्ड बनवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी सेंटर सुरु करण्यात आले आहे. सेंटरवर जावून तुम्ही आधार कार्ड बनवू शकतात. सेंटरवर गेल्यानंतर तुम्हाला ई-आधारची कॉपी द्यावी लागेल. अवघ्या 10 ते वीस मिनिटांत तुम्हाला प्लास्टिक आधार कार्ड मिळू शकेल. देशातील विविध राज्यांत प्लास्टिक आधार कार्डसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते.
मात्र, तुमच्याकडे आधारकार्ड नसेल तर आधी तुम्हाला जुन्या प्रक्रियेने आधार कार्ड बनवावे लागेल. या सर्व प्रक्रियेाला किमान एक महिन्याचा कालावधी लागतो. आधार कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही प्लास्टिक आधार कार्डसाठी अर्ज करू शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा