सारखेपणा /वेगवेगळेपणा मुलांना शिकविण्यासाठी चित्र कार्ड तयार करणे .(वर्ग १ ला व २ रा)

Ⓜज्ञानरचनावाद शैक्षणिक साहित्य (वर्ग १ ला व २ रा)
🅰साहित्याचे नाव : - सारखेपणा /वेगवेगळेपणा मुलांना शिकविण्यासाठी चित्र कार्ड तयार करणे .

🅿साहित्य : - मणी,थर्माकोल,एका रंगाच्या बांगड्या,रंगीत कागद , एकाच झाडाची फुले ब पाने , एकाच धान्याच्या पिशव्या, डाळीच्या पिशव्या, डब्याच्या बाटल्यांची झाकणे, बिल्ले, वाट्या,वही, पेंसिल, पुठ्ठा,कार्डशीट. खडु,स्केचपेन,ईत्यादी

साहित्य आकृत्या: -

🔲🔳◼◻◽▫▪

⚪⚫🔵🔴

सारखेपणा /वेगवेगळेपणा

Ⓜचित्रकार्ड तयार करतांना ५ × ४ पांढरे स्वच्छ कार्डशीट वापरा. दोन कार्डशीट वर दोन सारख्याच आकृत्या काढा.

🅰साहित्याचा वापर : - मुलांना शिकवितांना प्रथम प्रत्यक्ष वस्तु वापर करावा. त्यानंतर चित्र कार्डाचा वापर करावा. त्यापुढे अंककार्डाचा वापर करावा.

🅿प्रत्यक्ष वस्तू तयार करणे : -
१) मुलांना प्रथम सर्व वस्तू हाताळता येतील अशा स्वरूपाच्या घ्याव्यात.

२) मुलांना दोन वस्तू मधील सारखेपणा शिकवावा.

३) प्रथम सर्व वस्तु टेबलावर टोपलीत मुलांच्या समोर ठेवाव्यात . त्या वस्तू मुलांकडून ओळखुन घ्याव्यात. अनोळखी वस्तू असल्यास विद्यार्थ्यास त्याचे निरीक्षण करण्यास द्यावे .

४) एका टोपलीतील सर्व वस्तू मुलांनी ओळखल्यास तशीच दुसरी टोपली (त्याच वस्तुंची) मुलांसमोर ठेवून मुलांना दोन्ही वस्तूतील सारख्या वस्तु दाखवाव्यात.नंतर त्याच वस्तू  शोधून काढायला सांगाव्यात . (विद्यार्थ्यांने सारख्या वस्तू ओळखल्या नंतर दृढीकरणासाठी दोन्ही टोपल्यातील शिक्षकांनी वस्तूचे नाव सांगून/वस्तू दाखवून त्याप्रमाणे दुसरी वस्तू आणण्यास सांगावी घरून येतांना आजूबाजूच्या परिसरात सारख्या दिसणा-या दोन सारख्या वस्तु मुलांना आणावयास सांगाव्यात.
➖➖➖➖Ⓜ🅰🅿➖➖➖

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक