♻ चढता उतरता क्रम✳

1⃣2⃣3⃣4⃣3⃣2⃣1⃣
🌺ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य ♻ चढता उतरता क्रम✳
🔹एक अर्धा माउंटबोर्ड घ्या
🔹20 सेमी लांबी व रूंदी असलेला काटकोन तयार करा
🔹2 सेमी अंतराप्रमाणे एकुण 10 पायर्‍या तयार करा
🔹आता जिन्याप्रमाणे आकृती तयार होइल
🔹प्रत्येक पायरीवर 1 ते 10 अंक खालच्या पायरीपासुन वर लिहा
🔹काटकोनाच्या तिन्ही टोकापासुन 2 सेमी अंतरावर तिन छोट्या खिराळी किव्वा शिलाइमशीन मधील बाॅबीन फेव्हीकाॅल लावून चिपकवा
जेणेकरून त्यामधून धागा फिरायला हवा
🔹 तिन्ही खिराडीमधून एक सलग धागा पाठवा व गाठ मारून पुर्ण करा
🔹 आता धागा त्रिकोणाकृती बाधंल्या गेला आहे
🔹या धाग्यावर पहिल्या पायरीवर एक मुलगा  किवा मुलगी किव्वा कोणतेही चित्र फेव्हीकाॅल ने चिपकवा
🔹 आता धागा मागेपुढे केला तर मुलगा पायरी क्रमाणे वर चाढेल किव्वा खाली उतरेल
🌺🌺  यावरून आपण विद्यार्थी ना अंकाचा चढता उतरता क्रम आपण सहज बोलक्यापद्धतीने समजावून देउ शकतो
वैशिष्ट्ये🌿 साहीत्य अल्पदरात 15 ते 20 रू तयार होते
🔹 बहुवर्ग अध्यापणास उपयोगी
🔹 तुटफुटीची भिती नाही दुरूस्ती करता येते
     🌺🌺 सुधीर बोरेकार
9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक